Ad will apear here
Next
‘स्वच्छ, निर्मल, हरित वारी अभियानाला शासनाचे सहकार्य’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई : ‘स्वच्छ वारी, स्वस्थ वारी निर्मल वारी, हरित वारी हा उपक्रम अतिशय चांगला असून, या उपक्रमामुळे वारीची पवित्रता वाढेल यासाठी शासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मंत्रालय समिती कक्षात आयोजित समर्थ भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना आळंदी ते देहू-पंढरपूर राष्ट्रीय दिंडी सल्लागार आयोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण, क्रीडामंत्री विनोद तावडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आदी मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘वारीचे ईश्वरी कार्य आपल्या हातून घडेल. या वारीच्या अभियानात चांगल्या संकल्पना अंतर्भूत आहेत. त्यातून नवा पायंडा घालवून दिला जात आहे. या अभियानात सुमारे ३० ते ३५ हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आयुष्यातील हे क्षण महत्त्वाचे ठरतील. विद्यार्थी वारीच्या परंपरेशी जोडले जाणे त्यांच्यासाठी भाग्याचे ठरेल. विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी वारीतील अनुभव मार्गदर्शक ठरतील. या अभियानात विद्यापीठ आणि विविध संस्थांचा सहभाग हा अभिनंदनीय आहे.’

बैठकीत विविध संस्थेतर्फे अभियानाबाबत सादरीकरण करण्यात आले. या अभियानात २२ जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २० हजार विद्यार्थी स्वच्छ वारी, स्वस्थ वारी निर्मल वारी, हरित वारी महासंकल्प शपथ घेणार आणि २० हजार विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी कडुलिंब वृक्षाची २० हजार रोपे वितरीत करण्याचा गिनिज वल्ड रेकॉर्ड करणार आहेत.

या बैठकीचे प्रास्ताविक संजय चाकणे यांनी केले. अभियानाचा हेतू राजेश पांडे यांनी स्पष्ट केला. बैठकीला पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मिलिंद म्हैसेकर, सोलापूर विद्यापीठाचे उप कुलगुरू एस. आय. पाटील, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, वारकरी संघटनेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZSMCB
Similar Posts
कडुनिंब लागवडीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद पुणे : ‘निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ हे अभियान महत्त्वपूर्ण असून, राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात केलेल्या कडुनिंब लागवडीच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे देशाचे नाव जगाच्या नकाशावर गेले असून, यात सहभागी झालेले
‘कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली’ मुंबई : राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊनही उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टन झाली. शेतीतील गेल्या साडेचार वर्षांतील गुंतवणूक आणि जलसंधारणाच्या कामांचे हे यश आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बि-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा रथ रवाना मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या प्रस्तावित महाजनादेश यात्रेचा सुसज्ज रथ मंगळवारी (३० जुलै) मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केला.
देवेंद्र फडणवीस यांची एक ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा मुंबई : राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कर्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून एक ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language